प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

ग्रामीण रूग्णालयास सुविधांसाठी निधी देणार : पवार

उमराणे । वार्ताहर Umrane

उमराणे ग्रामीण रुग्णालयात (Umrane Rural Hospital) प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे (Oxygen Generation Project) आज लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे रोज शंभर रूग्णांना प्राणवायू (oxygen) उपलब्ध होवू शकणार आहे. रूग्णांना रुग्णालयात एक्स-रे (X-ray), सिटीस्कॅन (Cityscan), बालरोग तज्ञ (pediatrician) आदी विविध सुविधा मिळाव्यात यासाठी निधी (fund) उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी येथे बोलतांना दिली.

देवळा (Deola) व उमराणे (Umrane) येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण (Dedication of Oxygen Generation Project) आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उमराणे येथे 1 कोटी, 40 लाख रुपये खर्चून प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात (dedication ceremony) मार्गदर्शन करतांना ना.डॉ. पवार बोलत होत्या. आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उमराणे माझे माहेर असून या ठिकाणी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण आपल्या हस्ते होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत डॉ. पवार पुढे म्हणाल्या, करोना संकट काळात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, नर्स यांनी दिवसरात्र परिश्रम घेत बाधीत रूग्णांवर केलेले उपचार तसेच संक्रमण फैलावू नये यास्तव सातत्याने करत असलेली जनजागृती स्पृहणीय आहे त्यामुळेच करोना आटोक्यात आला आहे. करोनास हद्दपार करण्यासाठी यापुढेही नियम पाळत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी केले. माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधा व ज्यादा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी आ.डॉ. राहुल आहेर, जि.प. सदस्य यशवंत शिरसाठ आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जि.प. सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी जि.प. उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, उपसभापती धर्मां देवरे, सरपंच कमल देवरे, उपसरपंच विश्वनाथ देवरे, माजी सभापती विलास देवरे, शेतकरी संघ अध्यक्ष संदीप देवरे, माजी सभापती राजेंद्र देवरे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पवार, डॉ. भट, डॉ. राठोड, डॉ. रणदिवे, डॉ. रामदास देवरे, ग्रा.प. सदस्य सचिन देवरे, भरत देवरे, प्रमोद देवरे, देवा वाघ, भिला देवरे, ललित देवरे, सुजन ओस्तवाल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन सुनिल देवरे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com