ग्रामीण रुग्णालयांसाठी ऑक्सीजन यंत्रांचे लोकार्पण

ग्रामीण रुग्णालयांसाठी ऑक्सीजन यंत्रांचे लोकार्पण

मुंजवाड । वार्ताहर |Munjwad

बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) प्रत्येक ग्रामीण रुग्णालय (rural hospital) व प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) ऑक्सीजनच्या (Oxygen) बाबतीत आ. दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांच्या स्थानिक निधीतून (fund) उपलब्ध ऑक्सिजन यंत्रांमुळे स्वयंपूर्ण होतांना दिसत आहेत. या ऑक्सिजन यंत्रांचे आ. बोरसे यांनी लोकार्पण केले.

करोनाशी (corona) सामना करतांना ऑक्सीजनचा तुटवडा (Lack of oxygen) निर्माण होऊ नये म्हणून आ. दिलीप बोरसे आपल्या स्थानिक निधीतून तीस लाख रुपयांची ऑक्सीजन यंत्रे (Oxygen devices) खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 17 तर दुसर्‍या टप्प्यात 40 ऑक्सीजन यंत्रे उपलब्ध झाली होती. त्यांचे आ. बोरसे यांनी 3 ग्रामीण रुग्णालयांसह 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना लोकार्पण केले. ऑक्सीजन यंत्रे उपलब्ध करून देण्यात आ. बोरसे उत्तर महाराष्ट्रात अव्वल ठरले आहेत.

सटाणा (satana), नामपूर (nampur), डांगसौंदाणे (Dangsaundane) येथील ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी 8 तर ब्राम्हणगाव, अंबासन, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, साल्हेर, अलियाबाद, केळझर, कपालेश्वर, वीरगाव, निरपूर अशा 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांंना प्रत्येकी 3 ऑक्सीजन यंत्रांचे वाटप करण्यात आले. आ. बोरसे यांनी उपलब्ध केलेले ऑक्सीजन यंत्रे बागलाणकरांसाठी संजीवनी ठरले असून करोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी समजतो. त्या जबाबदारीतूनच ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध करून दिली. करोनाचा सामना करण्यासाठी या यंत्रांची मोठी मदत झाली. भविष्यात देखील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांचा मोठा फायदा होईल. आरोग्य विभागाने देखील योग्य देखभाल करून यंत्रे रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर ठेवावित.

- आ. दिलीप बोरसे

Related Stories

No stories found.