परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे आज लोकार्पण

परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे आज लोकार्पण

गोल्डन हेल्थ कार्डचे होणार वाटप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक अंतर्गत नव्याने स्थापित झालेले परिचारिका प्रशिक्षण केंद्र मोहाडी (Nurse Training Center Mohadi )ता.दिंडोरी येथील नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी ( दि.१६) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रविण पवार ( Minister Dr. Bharti Pawar ) यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहणार आहे.

तसेच या ठिकाणी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत स्थानिक लाभार्थींना गोल्डन हेल्थ कार्ड देण्यात येणार आहेत.परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहावे व हेल्थ कार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.रघुनाथ भोये, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ के आर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, आरोग्य अभियान कार्यक्रमाधिकारी डॉ राहुल हाडपे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com