अहिंसा स्तंभाचे लोकार्पण

भगवान महावीरांच्या उपदेशाचे स्तंभामुळे स्मरण : कांदे
अहिंसा स्तंभाचे लोकार्पण

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

अहिंसा (non-violence) स्तंभाची निर्मिती सकल जैन समाजाची (jain society) मागणी व माताजींच्या इच्छेनुसार कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता करण्यात आली आहे.

या स्तंभामुळे भगवान महावीरांच्या (mahavir) अहिंसा परमो धर्म या उपदेशाचे प्रत्येकास स्मरण होणार असल्याचे स्पष्ट करत आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांनी भगवान महावीरांचा आशीर्वाद व राष्ट्रसंत गणिनी आर्यिका सूर्यप्रकाशमती माताजी (Rashtrasant Ganini Aryika Suryaprakashmati Mataji) यांच्या आशीर्वादाचा दुर्मिळ योग आपल्याला लाभला आहे. या आत्मिक समाधानाच्या जोरावर जास्तीतजास्त विकासकामे आपण साकारू, अशी ग्वाही येथे बोलतांना दिली.

येथील जैन बांधवांच्या वतीने नव्या राष्ट्रीय महामार्गावरील शहराचा प्रवेशव्दार असलेल्या मालेगाव (malegaon) - मनमाड (manmad) या त्रिफुलीवर उभारण्यात आलेल्या अहिंसा चौकाचे लोकार्पण (Dedication of Ahimsa Chowk) गुरूमाँ आर्यिका सूर्यप्रकाशमती माताजी व आ. सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अंजुम कांदे, उज्वला खाडे, बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, प्रमोद भाबड, माजी सभापती विलास आहेर, बाळू कांदे, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहरप्रमुख मुज्जूभाई शेख, राकेश ललवानी, आनंद कासलीवाल, विजय चोपडा आदि उपस्थित होते.

व्यापारी वर्ग आपल्याबद्दल बोलतांना नाखूश असायचा, विश्वास ठेवतांना तर दोन वेळा विचार केला जायचा अशी परिस्थिती होती. मात्र आपण करत असलेल्या समाजकारणामुळे व्यापारी वर्ग आज आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करीत असल्याने आनंद आहे, असे स्पष्ट करत आ. कांदे पुढे म्हणाले, माताजींना दिलेल्या वचनाची पूर्ती झाली आाहे.

आगामी काळात नांदगाव (nandgaon) व मनमाड पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलतांना सांगितले. यावेळी मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. जयकुमार कासलीवाल यांनी समाजाच्या मागणीचे पूर्ततेसाठी आ. कांदे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केले.

यावेळी विधीतज्ञ अ‍ॅड. जयकुमार कासलीवाल, आनंद कासलिवाल, नीलेश लोढा, पारस लोहाडे, अध्यक्ष सुशील कासलीवाल, बापूसाहेब कवडे, महाविर पारख आदीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जैन समाजाची मागणी पूर्ण केल्याबद्दल आ. कांदे, अंजूम कांदे यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सकल जैन बांधवांतर्फे जैन मंदिरापासून अहिंसा स्तंभापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र बोरा यांनी केले. कार्यक्रमास जैन समाजबांधवांसह नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com