आपत्कालीन प्रतिसाद यंत्रनेच्या डायल- ११२ प्रकल्पाचे लोकार्पण

आपत्कालीन प्रतिसाद यंत्रनेच्या डायल- ११२ प्रकल्पाचे लोकार्पण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद (Maharashtra Emergency Response ) यंत्रणा डायल '११२' प्रकल्पाचा ( dial 112 Project )लोकार्पण सोहळा महाराष्ट्र सायबर कार्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते संपन्न झाला.

नाशिक जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Nashik District Superintendent of Police Sachin Patil ) यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे उपस्थित राहुन नाशिक ग्रामीण जिल्हयात डायल ११२ प्रकल्प राबविण्याकरीता ५७ दुचाकी वाहने व ४६ चारचाकी वाहने उपलब्ध करून दिली.

जिल्हयात कोठेही अनुचित प्रकार घडला अथवा कोणास आपत्कालीन काळात मदत लागल्यास टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधल्यास पोलीस यंत्रणेकडुन तात्काळ आवश्यक ती मदत उपलब्ध होईल. डायल ११२ ची प्रणाली पोलीस कंट्रोल रुमला ( Police Control Room )जोडण्यात आली आहे.

हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर तात्काळ दखल घेतली जाणार असुन या प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद देता येईल, आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल. नाशिक ग्रामीण जिल्हयातील नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत लागल्यास डायल ११२ हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.