अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

आगीच्या घटनांमध्ये नुकसान टळेल : महापौर

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव शहरातMalegaon City अनेक भागात लहान रस्ते आहेत. यामुळे आगीच्या घटना Incidents of fire घडल्यास अग्निशमनाचे मोठे बंब नेण्यास मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता. यामुळे मनपा जनरल निधीतून 50 लाखांचा खर्च करत दोन अत्याधुनिक अग्निशमन बंबांची खरेदी करण्यात आली आहे. या बंबांमुळे अग्नितांडवावर नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य होवून जनतेचे आर्थिक नुकसान टळेल, असा विश्वास महापौर ताहेरा शेख Mayor Tahera Shaikhयांनी व्यक्त केला.

मनपातर्फे घेण्यात आलेल्या अत्याधुनिक सामुग्रीने सुसज्ज दोन अग्निशमन बंबांचे लोकार्पण महापौर ताहेरा शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर निलेश आहेर, माजी आ. शेख रशीद, सभागृहनेते असलम अन्सारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना महापौर ताहेरा शेख बोलत होत्या.

सर्व शहरवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत महापौर ताहेरा शेख यांनी अत्याधुनिक मिनी अग्निशमन बंब घेण्यामागचा उद्देश विषद केला. झोपडपट्टी तसेच संकिर्ण नागरी वस्त्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीच्या घटना घडल्यास याठिकाणी मोठी अग्निशमन वाहने जाण्यास अडचणी येत होत्या पर्यायी आगीवर नियंत्रण मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा प्रत्यय शहरातील नागछाप झोपडपट्टी येथे काही दिवसापूर्वी आग लागली त्यावेळी आला होता.

हे लक्षात घेत मनपाच्या जनरल निधीतून 50 लक्षांचे अत्याधुनिक मिनी दोन अग्निशमन वाहने घेण्याचा निर्णय घेतला व आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या वाहनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही वाहने आजपासून शहरवासीयांच्या सेवेसाठी सुसज्ज राहतील, असे महापौरांनी शेवटी बोलतांना सांगितले.

यावेळी उपमहापौर नीलेश आहेर यांनी छोटे-मोठे रस्ते या ठिकाणी या दोन मिनी अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचा वापर होवू शकणार असल्याने आगीच्या घटनांवर त्वरीत नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले. अग्निशमन अधिकारी संजय पवार यांनी दोन्ही बंबांच्या उपयुक्ततेची माहिती दिली. अत्याधुनिक सुविधांमुळे आपत्कालीन परिस्थितीत शहरातील जनतेच्या सेवेसाठी हे बंब उपयुक्त ठरतील, असे पवार यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमास उपायुक्त राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त हरिष डिंबर यांच्यासह मनपा पदाधिकारी, अधिकारी व सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com