प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे Builder Deepak Chande यांच्या संकल्पनेतून प्राण्यांसाठी साकारलेल्या अभिनव रुग्णवाहिकेचे ambulance for animals लोकार्पण नुकतेच केंद्रीय रस्ते विकास आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी Union Road Development Minister Nitin Gadkari यांच्या हस्ते करण्यात आले.

मुक्या प्राण्यांना त्यांच्या आजारपणात अथवा जखमी झाल्यास रुग्णालयात किंवा अपघातस्थळावरून नेण्यासाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध नाही. या विचारातून ही रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. नितीन गडकरी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या संकल्पनेचे कौतुक व या कार्याबद्दल चंदे यांची प्रशंसा केली.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव उपस्थित होते. ही रूग्णवाहिका नाशिक महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली. गुजरातमधून विशेषत्वे हायड्रोलिक ट्रॉलीच्या सुविधेसह तयार केलेल्या सुसज्ज अशा या अभिनव रूग्णवाहिकेसाठी 30 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. रूग्णवाहिकेसाठी दरमहा लागणारा खर्चदेखील चंदे करणार आहेत.

Related Stories

No stories found.