कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात बाजार समिती आवारावर APMC लाल कांद्याची Onion आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी भावात घसरण होत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.येत्या एक-दोन आठवड्यात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने भाव Onion Rates आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लाल कांद्याला चांगल्या दर्जामुळे चांगले भाव मिळत असल्याने लासलगाव बाजार समिती Lasalgaon APMC आवारावर दररोज साधारण वीस हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होत आहे. पुढच्या आठवड्यात कांदा आवकेत तीस हजाराच्या वर कांदा विक्रीसाठी येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गत आठवड्यात सोमवारी (दि. 13) 2,500 रुपये इतका प्रति क्विंटल कांद्याला दर मिळत होता. तो आता सहा दिवसातच 1,600 रुपयांवर आला आहे.यामुळे कांदा उत्पादकांमध्ये खर्चही भरून निघेल की नाही याची भीती आहे. मागील आठवड्यात लासलगावला कांद्याला किमान 700 तर कमाल रुपये 3,500 तर सर्वसाधारण 2,427 रुपये दर होता.

उन्हाळ कांद्याची 19,899 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान 600 रुपये, कमाल 3,200 रुपये, तर सर्वसाधारण 2,265 रुपये प्रतिक्विंटल राहिले. लासलगाव बाजारात सरासरी कांदा भावात नऊशे रुपयांची घसरण झाली आहे.मंगळवारी लासलगाव कांदा बाजारपेठेत लाल कांद्याक्सही आवक अंदाजे 13515 क्विंटल (901 नग) इतकी झाली.भाव प्रतिक्विंटल किमान 701 रुपये तर कमाल 2370 रुपये सरासरी 2025 रुपये असा दर मिळाला.

पिंपळगांव बसवंत बाजार समितीवर लाल कांदा 385 ट्रॅक्टर तर 542 जीपमधून कांदा आवक झाली.बाजारभाव किमान 1000 रुपये,कमाल 2902 रुपये तर सरासरी 1951 रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला किमान 500 रुपये किमान 2100 रुपये तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com