दरवाढीने इंधन विक्रीत घट

पेट्रोल पंपांना ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ
पेट्रोल
पेट्रोल

नाशिक । प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने 101 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. नाशिक मधील इंधन दारातील वर्षभरातील वाढ 41 टक्के आहे. त्यामुळे मध्यमवर्गींयांना त्यांची मोठी झळ सहन करावी लागत आहे. त्याचा परिणाम 40टक्के इंधनविक्री घटली आहे.

स्वयंपाकाचा गॅसही 900 रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच करोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे,त्यात महागाईची भर पडली आहे. पूर्वी पेट्रोलवर एक्साईज ड्युटी 9.48 रुपये होती ती आज 32.90 रुपये आहे, डिझेलवर 3.56 रुपये होती ती आज 31.80 रुपये आहे. तसेच 2001 ते 2014 या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर 1 रुपया सेंट्रल रोड फंड सेस होता.

2018 मध्ये तो 18 रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर 18 रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर 2.50 तर डिझेलवर प्रति लिटर 4 रुपये कृषी सेस घेतला जातो.

गेल्या वर्षी 8 मे 2020 रोजी नाशिक मध्ये पेट्रोल 76 रुपये 72 पैसे होते तेच जुन 2021 ला 101 रुपये 94 पैसे झाले. 25 रुपये 22 पैसे त्यात वाढ झाला. गेल्या वर्षी मे 65 रुपये 60 पैसे लिटरने मिळणारे डिझेल आता 92 रुपये 56 पैसे आहे. इधन दरात जेवढी वाढ झाली, तेवढे वेतन कोेणाचेही वाढलेले नाही उलट कपात झाली आहे.

पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर, वाहन चालकांची घटत असलेली क्रय शक्ती, तसेे बेकायदा विक्रीे होणा़़र्‍या बायोडिझेल यामुळे अधीकृत पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीवर 40 टक्के परिणाम झाला आहे. मोठी गुंतवणूक करुन दिवसभर इंधन विक्रीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

-भूषण भोसले ( अध्यक्ष पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिेशन )

वर्षभरात 41 टक्क्यांनी इंधन दरवाढ झाली आहे. आता त्या प्रमाणात आरटीओंनी सुध्दा प्रवासी भाडे वाढवून देण्यास मान्यत दिली पाहिजे. किमना 50 ट्त्ते वाढ केली तरच रिक्षाचालकांना आपला व्यवसााय करणे शक्य होईल.

- शिवाजी भोर (रिक्षा चालक मालक संघटना)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com