कांदा आवकेत घट, बाजारभावात घसरण

कांदा आवकेत घट, बाजारभावात घसरण

येवला | प्रतिनिधी Yevla

येवला (Yevla ) व अंदरसुल( Andarsul ) मार्केट यार्ड मध्ये ( APMC ) या सप्ताहात उन्हाळ कांदा बाजारभावात व आवकेतही घसरण झाल्याचे दिसुन आले. देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधरण होती.

या सप्ताहात एकुण कांदा ( onion) आवक ४४ हजार १२३ क्किंटल झाली असुन, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० रूपये ते कमाल १ हजार ९७६ रुपये तर सरासरी १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.

तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक २३ हजार ८४६ क्विंटल झाली असुन, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रूपये ते कमाल १ हजार ९०१ रुपये तर सरासरी १ हजार ६०० रुपये प्रति पर्यंत होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com