कांदा दरात घसरण सुरूच

कांदा दरात घसरण सुरूच

सिन्नर । प्रतिनिधी

गत महिनाभरापासून कांद्याच्या भावात झालेली घसरण अद्याप सुरूच असून त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. आगोदरच खराब हवामानामुळे कमी उत्पादन निघत असतांना त्यातही भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

दुष्काळी समजल्या जाणार्‍या सिन्नर तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पारंपरीक पिकाला फाटा देत मोठ्या प्रमाणावर कांदालागवड केली. त्यासाठी अनेकांनी महागडे बियाणे खरदी केले. सुरुवातीच्या काळात कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी चांगले उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने खते आणि औषधांच्या मात्रा वाढविल्याने उत्पादन खर्चात देखील वाढ झाली.

कांदापिकासाठी मुबलक पाणी उपलबद्ध असले तरी यंदा काद्यासाठी पोषक हवामान न मिळल्याने त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांच्या उत्पादनावर झाला. मात्र महिनाभरापुर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहचल्याने उत्पादन कमी असले तरी चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण होते.

बोगस बियाण्याचा फटका

या हंगामात कांदा बियाण्याचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून आला. मात्र कांद्याला मिळणार्‍या चांगल्या दरामुळे शेतकर्‍यांनी अव्वाच्या सव्वा दराने कांदाबियाणे खरेदी केले. अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री करून शेतकर्‍यांची फसवणून केली. काही बियाणे उगवलेच नाही. तर काही बियाणांना लागवडीनंतर डेंगळे फुटल्याने शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाली. त्यातही आता भाव नसल्याने कांदा उत्पादकांवर संकट कोसळले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com