
पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palakhed Mirchiche
यंदा मार्चपासून उन्हाची तीव्रता अधिक होती. मध्यंतरी हवामान विभागाने (Meteorological Department) ही उन्हाची लाट (heat wave) असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले होते. उन्हाच्या तीव्रतेचा थेट परिणाम कांदा पिकांवर (onion crop) होऊन कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे.
तालुक्यात सध्या कांदा (onion) काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे कांदा काढणीच्या 10 ते 15 दिवस अगोदरच कांदा पात वाळुन त्याचा थेट परिणाम उत्पादन घटण्यावर झाला आहे. नगर (Ahmednagar), नाशिक (nashik), बीड (beed), सोलापूर (solpur), औरंगाबाद (aurangabad), पुणे (pune) आणि अन्य काही भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात यंदा लागवड झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 40 ते 50 टक्के कांद्याचे क्षेत्र वाढले आहे.
बियाण्यात फसवणूक व त्यामुळे झालेले नुकसान, दरात चढ-उतार यांसारख्या अडचणी झालेल्या असतानाही नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे 2 लाख हेक्टरच्या आसपास लागवड झाली आहे. राज्यात मार्चपासून उन्हाची तीव्रता अधिक आहे. काही दिवस लाट होती. त्याचा परिणाम उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे. पाण्याचे नियोजन देखील कोलमडल्याने नेहमी पेक्षा जास्त पाणी द्यावे लागले.
पाणी कमी पडल्यास कांदा पात वाळून नुकसान होऊ शकते. ज्या शेतकर्यांनी ही काळजी घेतली त्यांच्या कांद्यावर परिणाम होत नाही. याबाबत थेरगाव येथील शेतकरी सुनिल ढमे म्हणाले की, मार्च महिन्यात उन्हाची लाट होती. अजूनही उन्हाचा कडाका आहे. त्याचा परिणाम म्हणून आपोआप कांदा पात वाळली आणि नेहमीपेक्षा पंधरा दिवस आधीच कांदा काढणीला आला. त्यामुळे कांदा पोसण्यावर परिणाम झाल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे दिसत आहे.