शेतमालाची आवक घटल्याने बाजारसमितीच्या उत्पन्नात घट

शेतमालाची आवक घटल्याने बाजारसमितीच्या उत्पन्नात घट


पंचवटी | Panchavti

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने काही दिवसांपूर्वी लॉक डाऊन जाहीर केले आहे.

लॉकडॉऊन मुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने त्यातच ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकर्‍यांनी कोरोनाची धास्ती घेत पाठ फिरवल्याने दैनंदिन आवक ५० टक्के पर्यंत घटल्याने परिणामी बाजारसमितीच्या दैनदिन उत्पन्नात देखील साधारणपणे अंदाजे 3 लाख रुपयां पर्यंत घट होत आहे.


नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमाल खरेदी विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून उन्हाळा जाणवू लागल्याने सर्वत्र शेतमालाची आवक घटली आहे. त्यातच आता ग्रामीण भागात कोरोना विषाणूने डोकेवर काढल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.

शेतकऱ्यांनी देखील कोरोनाची धास्ती घेत शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण कमी केले आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करत लॉक डाऊन जाहीर केल्याने व्यापारी वर्गाने देखील शेतमाल खरेदी कडे दुर्लक्ष केले आहे.

त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या दैनंदिन शेतमालाच्या आवकेवर झाला आहे. परिणामी बाजारसमितीत आवक तर घटली आहेच शिवाय बाजारसमितीच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे.+

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com