जिल्ह्यातील दुर्गांना राज्य संरक्षित स्मारके घोषित करा

जिल्ह्यातील दुर्गांना राज्य संरक्षित स्मारके घोषित करा

शिवकार्य गडकोट संस्थेची मागणी

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील (Nashik District ) ६० हुन अधिक डोंगरी गडकिल्ल्याना (District Fort) राज्यसरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य संरक्षित स्मारके (State protected monuments) असा दर्जा जाहीर करावा अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने (Shivkary Gadkot Organization) केली आहे.

नाशिकच्या भूमीत राज्यातील सर्वाधिक डोंगरी किल्ले आहेत. तसेच या भूमीत असलेले दुर्गांची आत्यंतिक दुरावस्था (Fort Bad Condition) झाली आहे. यातील अनेक दुर्ग दुर्लक्षित (Fort ignored) आहे. जिल्ह्यातील एकूण गडकिल्ल्यांपैकी ३० हुन अधिक दुर्ग वनदुर्ग आहेत.

यातील उर्वरित दुर्ग राज्य पुरातत्व विभाग (State Archaeological Department), जिल्हा प्रशासन महसूल यंत्रणेच्या (District Administration Revenue)

ताब्यात आहे. या दुर्गांचा उरला सुरलेला ऐतिहासिक ठेवा (Historical Place) भग्नावस्थेत पडझडीत आहे. या किल्ल्यांच्या भूमीत दुर्मिळ वनसंपदा, वनौषधी, रानफळे, फुलं, वन्यप्राणी, पक्षी आहेत. यांचे संरक्षण, संवर्धन याकामी संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिवकार्यचे राम खुर्दळ (Ram Khurdal) यांनी सांगितले.

दरवर्षी या पर्वतरांगेत वणवा लागतो अन दुर्गांवरील, डोंगर रांगेतील जैवविधता जळून खाक होते. तसेच वन्यप्राणी, पक्षी परागंदा होतात, प्रसंगी होरपळतात. याकामी जिल्ह्यातील दुर्गांवर गेल्या १५ वर्षे अखंडित दुर्गसंवर्धन करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने वनविभाग, राज्य पुरातत्व,तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली. मात्र अद्यापही यावर ठोस पाऊले उचलली जात नसल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील काही किल्ल्यांच्या पायथ्याशी अवैध बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकामी स्थानिक लोकांनी आवाज उठवला पाहिजे, मात्र तसे फार होत नाही. त्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काम करायला हवं.

- राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संस्था

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com