नांदगावी ओला दुष्काळ जाहिर करा

मुख्यमंत्री-पुर्नवसन मंत्र्यांन साकडे : आ. कांदे
नांदगावी ओला दुष्काळ जाहिर करा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अतीवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असून पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूरपरिस्थिती कायम आहे.

महापुरामुळे अनेकांचा संसार उध्वस्त झाला आहे, अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असलेला शेतकरी (Farmer) बांधव पावसापुढे हतबल झाला असल्याने त्यांना मदत व आधार देण्याची गरज आहे. यासाठी शासनाने नांदगाव मतदारसंघात (Nandgaon constituency) ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करावा,

व त्वरीत शासकीय सोपस्कार पार पाडून शेतकर्‍यांना, सामान्य नागरिकांना, व्यावसायिकांना मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांना निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी दिली आहे.

नांदगाव मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कापणीवर आलेल्या हिरव्यागार पिकांची डोळ्यासमोर होत असलेली नासाडी पाहून शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पिकांसोबत जनावरांची गैरसोय होत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून कधी नव्हे ते नांदगाव शहरात तीन वेळेस महापूर आला त्यामुळे गोरगरीब सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शहरात महापुराचे पाणी घुसल्यामुळेे काहींचे घरे वाहून गेली तर काहींच्या दुकानात पाणी गेल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात जनावरेही वाहून गेली, तर काही ठिकाणी घरे पडली तसेच शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच मेटकुटीस आलेला शेतकरी यामुळे पूर्णतः उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाला आहे.

या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणे करिता नांदगाव विधानसभा मतदारसंघ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा व तातडीने मदत जाहीर करावी, आग्रहाची विनंती मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून केली असून या मागणीसंदर्भात सहानभुतीपुर्वक व सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.