ब्रह्मगिरी परिसंवेदनशील क्षेत्र जाहीर करा : राजेंद्रसिंह

ब्रह्मगिरी परिसंवेदनशील क्षेत्र जाहीर करा : राजेंद्रसिंह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwar) ब्रह्मगिरी (Brahmagiri) पर्वतावरील सौंदर्य (Beauty) आणि जैवविविधता (Biodiversity) अबाधित ठेवण्यासाठी परिसंवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सेटिव्ह) जाहीर करण्यासाठी केवळ सीमा निश्चिती करणे अपेक्षित आहे...

त्यासाठीची कार्यवाही सूरु झाली असून त्याचा आराखडा वनविभागाच्यावतीने (Forest Department) मंजुरीसाठी नागपूरला (Nagpur) पाठविण्यात आला आहे. तरी हे काम लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह (Rajend Singh) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर हे काम पुर्ण झाल्यावर आपण नाशकात राष्ट्रीय पर्यावरण संमेलन घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी नदीचे (Godavari River) उगमस्थान आहे. केवळ नाशिक महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सहा राज्यातून वाहताना संपूर्ण परिसर गोदामाईने सुजलाम सुफलाम केला आहे.

त्यामुळे हे क्षेत्र परिसंवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) म्हणून आरक्षित (Reserved) करण्यासाठी आग्रह सुरू झाला. आणि ते होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाला आहे. जे वाचवले पाहिजे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असताना आर्थिक लाभासाठी तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम चुकीचे असून त्याला आळा घालण्याची गरज आहे.

ज्या ठिकाणी गोदावरीचा उगम आहे. तेथूनच ही नदी प्रदुषित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे सांगताना ब्रह्मगिरीच्या उत्खनाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी उचलेल्या पावलामुळे ते आज तरी थांबले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी काही कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचे कौतूकही राजेंद्रसिंह यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com