निमा निवडीबाबत आज निर्णय

निमा निवडीबाबत आज निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उद्योजकांच्या निमा NIMA संस्थेच्या निवडीसाठी मंगळवारी मुलाखतींच्या तारखा जाहीर होणार होती. मात्र, धर्मादाय सहआयुक्तांनी संस्थेच्या फेरफार अर्जासह अन्य खटल्यांबाबतच्या सद्यस्थितीची माहिती देण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.

त्यामुळे विश्वस्त निवडप्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत. विश्वस्तपदासाठी निमाच्या अर्ज करणार्‍या 39 इच्छुकांपैकी सर्वसंमतीने सात नावे कळवावीत, अशी सूचना धर्मादाय सहआयुक्तांनी माजी पदाधिकार्‍यांना केली होती.

मात्र, मुदतवाढ देऊनही ते विश्वस्तांची नावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे धर्मादाय सहआयुक्तांनी माजी पदाधिकार्‍यांना पाचारण केले होते. धर्मादाय सहआयुक्त शुक्रवार (दि.9) याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com