शुक्रवारी लागणार जिल्ह्यातील शाळांचा 'निकाल'

पालकमंत्री भुजबळ घेणार आढावा बैठक
शुक्रवारी लागणार जिल्ह्यातील शाळांचा 'निकाल'
संग्रहित

नाशिक | Nashik

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona Crisis) बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय आता पालकमंत्री (Minister chhagan Bhujbal) घेणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने (Education department) या निर्णयाचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

कोरोना नियंत्रित असलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू (School Started) करण्याचा निर्णयानंतर झालेल्या अभिप्राय सर्वेक्षणात नाशिकमधील ४७ हजारांपेक्षा जास्त पालकांनी सहभाग घेतला होता. त्यानुसार बऱ्याच पालकांनी प्रत्यक्ष शिक्षणाला होकार दर्शविला तरी शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे (District Disaster Management) सोपविण्यात आला आहे.

दर आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ कोरोना परिस्थितीचा आढावा (Corona Crisis) घेत असतात. येत्या शुक्रवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत हा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शासनाच्या नियम आणि अटींसह १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासंदर्भात ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन व पालकांची संमती देखील अपेक्षित असणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com