परसेवेतील उपायुक्तांना परत पाठवण्याचा निर्णय

सर्वपक्षीय विरोधानंतर महापौरांचा निर्णय
परसेवेतील उपायुक्तांना परत पाठवण्याचा निर्णय
Kashyapi project affected get NMC jobs

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिका महासभेचे अधिकार डावलून प्रशासनाने परस्पर आस्थापनावर दाखल करुन घेतलेल्या परसेवेतील दोन उपायुक्तांना पुन्हा मुळ सेेवेत परत पाठवा आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक अधिकार्‍यांची या पदावर नियुक्ती करावी असा महत्वपूर्ण निर्णय महापौर सतिश कुलकर्णी यांनी घेतला. दरम्यान पदोन्नती कमेटीची तत्काळ बैठक घेण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

नाशिक महानगरपालिकेची व्हिडीओ कॉन्फरसिंग महासभा काल (दि.१४) महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिका आयुक्तांच्या सभागृहात महापौर, सभागृह नेते व अतिरिक्त आयुक्त अष्टीकर यांच्या उपस्थितीत नगरसेवक घरातून सहभागी झाले होते. महापालिका आस्थापनावर परसेवेतून दाखल झालेल्या चार पाच अतिरीक्त आयुक्त व उपायुक्त यांंना रुजू करुन घेण्यासंदर्भातील विषयावर जोरदार चर्चा झाली.

यात चर्चेत बग्गा यांनी महापालिकेतील उपायुक्तांच्या जागांसंदर्भात व यात परसेवेतील किती अधिकारी किती भरायचे ? यांसदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. याबाबत खुलासा करतांना उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी उपायुक्त पदाच्या चार जागा असल्याचे सांगत यात परसेवेतील २ अधिकारी भरता येतात असे स्पष्टीकरण दिले. यावर बग्गा यांनी पदोन्नतीच्या जागांवर प्रतिनियुक्तीचे अधिकारी कसे भरले? परसेवेतील अधिकार्‍यांना सेवेत हजर करुन घेण्याचा अधिकार महासभेचा असतांना प्रस्तावात माहितीस्तव उल्लेख कसा ? प्रमोशन कमेटीची सात वर्षापासुन बैठक घेण्यात न आल्याने प्रमोशन रोखले गेले आहे.

भुमिपुत्रांना डावलले जात असुन त्यांना न्याय द्यावा, दोन जागांवर स्थानिक अधिकारी भरावेत अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेत ४ पदे मंजुर असतांना ६ उपायुक्त असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी सांगत सभागृहाचे लक्ष वेधले. प्रमोशन देऊ नये म्हणुन हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

या चर्चेत डॉ. हेमलता पाटील मनपा अधिकार्‍यांवर अन्याय करणारा हा प्रकार असल्याबाबत मत मांडले. तर शाहु खैरे यांनी परसेवेतील अधिकार्‍यांना रुजू करुन घेत प्रशासनाने सभागृहाचा अवमान असल्याचे सांगितले.

या अधिकार्‍यांना तत्काळ परत पाठवा अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक अधिकार्‍यांवर अन्याय होता कामा नये असे सांगत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, हा प्रस्ताव फेटाळावा. सभागृह नेते सतिश सोनवणे यांनी सन २०१३ पासुन पदोन्नती कमेटीची बैठक झाली नसल्याचे सांगत हा प्रश्न तात्काळी मार्गी लावण्याची मागणी केली.

तसेच स्थानिक अधिकार्‍यांवर अन्याय होऊ नये असेही त्यांनी सांगितले. अशाप्रकारे चर्चेनंतर महापौर यांनी आस्थापनावर दाखल करुन घेतलेल्या परसेवेतील दोन उपायुक्त डहाळे व पगार यांना पुन्हा मुळ सेेवेत परत पाठवा आणि पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक अधिकार्‍यांची या पदावर नियुक्ती करावी असा निर्णय दिला.

महासभेतील महत्त्वपूर्ण निर्णय...

विषय पत्रिकेवरील इतिवृत्ताचे विषय तहकूब.

कोविड संदर्भात आठ दिवसात महासभा घेणार.

उपअभियंता भोये यांचा स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव तहकूब,

२०१७ च्या खर्चाच्या कार्योत्तर विषय तहकूब.

डॉ. फुलकर यांना ३० सप्टेंबरनंतर स्वच्छानिवृत्तीला मंजुरी देणार

विषय १५६ यावर स्थानिक नगरसेवकांशी चर्चा करुन निर्णय.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com