कंत्राटी कामगार
कंत्राटी कामगार
नाशिक

राज्य सरकारच्या कंत्राटीसेवकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

आंदोलन करणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

करोनाच्या काळात सेवकांना काढून न टाकण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेले असताना आता राज्य सरकारच्या कंत्राटी सेवकांवरच बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.

गेल्या 20 वर्षांपासून पाणी पुरवठा व स्वछता विभागात कंत्राटी सेवक म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे 1300 सेवाकांना आता काढून टाकण्याचे आदेश या विभागाने दिले आहेत. त्यामुळे सेवक हादरून गेले असून हवालदील झाले आहेत. या निर्णयाविरोधात त्यांनी आता मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच शासकीय सेवाकांना करोनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. त्यातही अत्यावश्यक बाब म्हणून पाणी पुरवठा विभागातील सेवकांना कामावर येण्याची सक्ती असल्यामुळे त्यांना सुट्याही घेता आलेल्या नाहीत. ज्या कंत्राटी सेवकांची मुदत लॉकडाऊनच्या काळात संपलेली होती. त्यांना दोन महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून करोनाचे काम करुन घेण्यात आले.

आता कंत्राटी कार्यकाळ संपण्यावर आलेला असताना त्यांना काढून टाकण्याचा निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 1300 सेवक बेरोजगार होतील.नाशिक जिल्ह्यात तालुकास्तरावर 34 व जिल्हास्तरावर 15 सेवक कार्यरत आहेत. त्यांना जिल्हा परिषदेने एक वर्षाची मुदतवाढ दिलेली असताना राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता या सेवकांचेही धाबे दणाणले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व सेवक लवकरच मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर सध्या चर्चा सुरु असल्याचे या सेवकांनी सांगितले.मंत्रिमंडळ बैठकीत विरोध डावलला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सेवकांना कायम करण्याची मागणी केली होती.

तसेच करोनाच्या काळात या सेवकरांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु, त्यांचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचे या सेवकांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com