शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा शुल्कात वाढीचा निर्णय

शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा शुल्कात वाढीचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची (students) शिष्यवृत्ती (scholarship) परीक्षा घेण्यात येते.

या परीक्षेचे प्रवेश शुल्क (entrance fee) व परीक्षा शुल्कामध्ये (exam fees) वाढ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (department of school education) 11 नोव्हेंबरला घेतला आहे. त्यानुसार आता शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेश शुल्क 50 रुपये तर परीक्षा शुल्क 150 रुपये असणार आहे.

राज्यभरात घेण्यात येणार्‍या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे (Application forms) भरणे, प्रश्नपत्रिका (Question paper) व उत्तरपत्रिका (answer sheet) व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल (remove) जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे, इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या परीक्षेचे प्रवेश शुल्क बिगर मागास विद्यार्थी, मागास विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Divyang students) 20 रुपये होते. परीक्षा शुल्कामध्ये मागास विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलत देण्यात होती तर बिगर मागास विद्यार्थ्यांकडून 20 रुपये आकारले जात होते. शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बिगर मागास विद्यार्थी, मागास विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुधारित प्रवेश शुल्क 50 रूपये करण्यात आले आहेत.

तर परीक्षा शुल्क बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 60 रुपयांवरून 150 रुपये आणि मागास विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क 75 रुपये केले आहे. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातुन 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. यामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 44 हजार 143 इतकी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com