धान खरेदीतील तुटीची भरापाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील साडे नऊशे आदिवासी विकास सोसायटयांना लागेलेली आर्थिक घरघर दुर करण्यासाठी धान खेरदीतील तुटीची भरापाई मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्य सहकारी अदिवासी विकास मंहामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वार्षीक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

दरम्यान गेल्या चार वर्षापासुन धान खरेदीतील तुट भरुन काढण्यासाठी महामंडळाने ठोस उपाययाजेना न केल्याने व धान खरेदीतील भरपाईची रककम देतान तुट वसुल केल्याने आज विदर्भातील बहुतांशी सोसायंट्यांच्या संंसदस्यांनी आदीवासी विकास मंंत्र्यांंना घेराव घालुन संंताप व्यक्त कला. त्यामुळे वार्षिक सभेवर नाराजीचे सावट पसरले होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी अदिवासी विकास मंहामंडळाची वार्षिक सभा आज आदीवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदक्षीणा सभागृहामध्ये झाली. यावेळी आदिवासी विकास महाडळांच्या व्यवस्थापकीय संचालीका लिना बनसोड, प्रधान सचीव प्रदीप व्यास, महाव्यवस्थापक बाबासाहेब शिंदे, आमदार सुनिल भुसारा, माजी आमदार धनराज महाले, संचालक भरतलाल दूधनाग, केवलराम काळे, मधुकर काठे, ताराबाई माळेकर, जयश्री तळवे, मिनाक्षी बट्टी उपस्थित होते.

यावेळी सदस्यांनी मिळत नसलेले कमीशन, गोदामांचा प्रश्न, व आर्थीक अडचणी मांडल्या. त्यावर डॉ. गावित म्हणाले, मागील काही वर्षात महामंडळाची परिस्थिती बिकट झाल्याचे दिसत आहे. तुटीमुळे महामंडळावर मोठा बोजा पडत आहे. काही नवीन फायद्याचे उपक्रम राबविले जात नाही. त्यामुळे या महामंडळाने या पुढे केवळ फाायद्याचाच विचार केला पाहीजे. तोट्याचे उद्योग बंद केले पाहीजे.

महामंडळाची ही परिस्थिती दूर करण्याबरोबरच विकास सोसायटयांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आता पुढाकार घेत तशी रणनिती ठरविली जाईल. या सोसाट्यो सक्षम करण्यासाठी सोसायटींच्या माध्यामातून कृषी विभागाच्या अवजार विक्री, खते विक्री, इतर अनेक योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे. उपस्थितीत असलेल्या विविध सोसायटींच्या सभासद यांनी आपापल्या समस्या मांडल्या.

प्रोसेसिंग युनिटसाठी महामंडळाकडून मदत

आदिवासी भागात जंगलातून गौण उपवनज गोळा करत त्याची विक्री करत आपला उदरनिर्वाह करणार्यांना आता महामंडळाच्या माध्यामातून मदत केली जाईल. त्यासाठी जेथून जे जे गौणउपवनज गोळा होते. तिथेच जवळच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्या आदिवासी लोकांना मदत केली जाईल.असे ते म्हणाले. त्यामुळे सभा नाराजीमुळे फारशी चर्चा न होताच समाप्त झाली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com