एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबितच

कामगार संघटनेची उद्या बैठक
एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबितच
एसटी

नाशिक | Nashik

एसटी महामंडळातील (ST Corporation) 2019 सालापासून सेवानिवृत्तांची व मृत कर्मचार्‍यांची (Retired Employee) अंतिम देयके प्रलंबित आहेत.

याबरोबरच विद्यमान एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) घरभाडे भत्त्ता व महागाई भत्ता (Home Allowance) वाढवून देण्यात यावा. अशा विविध मागण्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट (Maharashatra State Transport) एसटी कामगार संघटनेने (ST Worker's Organization) केल्या असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा (Agitation ) दिला आहे.

पुणे येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र एसटी कामगार संघट्नेची रविवारी (दि.4) राज्य कार्यकारीणीच्या बैठकीचे (ST Employees Selection Meeting) आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे (Organization President Sandip Shinde) यांनी आधीच म्हटले आहे.

एसटी सेवानिवृत्तांच्या थकीत देणी तातडीने देण्याबाबत यापुर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM uddhav Thakarey), उपमुख्यमंत्री (Deputy CM Ajit Pawar), अजित पवार आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केलेला आहे. एसटी प्रशासनाच्या वतीने उपाध्यक्ष चन्ने यांनी रक्कम देण्याबाबत अनुकुल मत व्यक्त केले आहे. दरम्यान, विद्यमान कर्मचार्‍यांना एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरीत रक्कम देण्यात यावी, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तातडीने व एकरकमी देण्यात यावीत, यासाठी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी नुकतीच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधीकारी मंदारजी पोहोरे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तांच्या व्यथा मांडल्या.

महामंडळाकडून कामगारांच्या प्रलंबित असलेल्या विविध समस्या कधी सोडवल्या जाणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com