वालदेवी धरण
वालदेवी धरण
नाशिक

वालदेवी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

परिसरात हळहळ

Gokul Pawar

Gokul Pawar

वाडीवऱ्हे । Wadivarhe

पिंपळद घोलपांचे जवळील वालदेवी धरणात पोहण्यास गेलेल्या चौघांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची शनिवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास घडली. मंगेश बाळासाहेब बागुल रा पाथर्डी फाटा (२९), लाळगे महेश रमेश (३०), वैभव नाना भाऊ पवार, सिडको (२८) अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अधिक माहिती अशी कि, वालदेवी धरण परिसरात आज दुपारच्या सुमारास चौघे मित्र फिरण्यास आले होते. यावेळी हे चौघेजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघेजण बुडाले. चौघांपैकी एकालाच पोहता येत असल्याने तो बाहेर पडला. तसेच आजूबाजूला आरडा ओरड करून स्थानिक गुराख्याना मदतीला बोलावले. परंतु तोपर्यंत तिघांनाही जलसमाधी मिळाली होती. तर त्यांचा मित्र गणेश एकनाथ जाधव हा सुखरूप बाहेर पडला.

याबाबत पिंपळद घोलपांचे येथील पोलीस पाटलांनी वाडीवऱ्हे पोळी स्थानकात माहिती दिली. वरीष्ठ पोलीस निरिक्षक विश्वजित जाधव, पोह खांडरे व इतर कर्मचारी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नाशिक रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com