टोळक्याच्या हल्यातील जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

टोळक्याच्या हल्यातील जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

जुन्या भांडणाची कुरापत काढून संतप्त झालेल्या चार जणांच्या टोळक्याने दोघा युवकांवर कोयता (sickle) व लाकडी दांड्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते, मात्र त्यातील एका युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू (death) झाल्याने पोलिसांनी (police) याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल (case of murder) करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मयूर फकिरा जाधव 23 रा चेहडी पंपिंग व त्याचा मित्र अक्षय संजय गायकवाड हे दोघे चेहडी कडून सामानगाव पॉलिटेक्निक कॉलेज (Samangaon Polytechnic College) कडे दि 5 ऑक्टोबर रोजी रात्री जात होते, म्हस्के यांच्या घराजवळ आले असता समोरून एक सफेद अल्टो वाहनात त्याचे मित्र उमेश गायधनी, ऋषी तुंगर, निखिल गायखे, गोपी पवार सर्व रा पळसे असे चौघे आले व त्यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण (beating) करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या कडे लोखंडी कोयता व लाकडी दांडे व इतर हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी अक्षय गायकवाड हा जास्त गंभीर झाला होता, त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात (Private hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, दोघांवर उपचार सुरू असताना त्यातील अक्षय गायकवाड याचा शनिवारी मृत्यू झाला,

दरम्यान या घटने प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, परंतु गायकवाड याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते,पुढिल तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस करीत आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com