शेततळ्यात बुडून तरुणीचा मृत्यू

शेततळ्यात बुडून तरुणीचा मृत्यू

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर तालुक्यातील ( Sinnar ) खंबाळे ( Khkambale ) येथे शेततळ्यात ( Farm Lake )बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दि.29 सकाळी 7.30 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (24) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल व मुलगी सोनल यांच्यासह वास्तव्यास असून शेती करतात. त्यांचे गट नं. 479 मध्ये शेततळे असून काल सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब आंधळे व मुलगी सोनल हे दोघे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते.

शेततळ्यातील पाणी पाहिल्यानंतर मुलगी सोनलने वडिलांना सांगितले तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते असे म्हटल्याने वडिल भाऊसाहेब घरी आंधोळ करण्यासाठी निघून आले. त्यानंतर अर्धातास होऊनही मुलगी सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता ती तेथे दिसली नाही. त्यामुळे भाऊसाहेब यांनी आजूबाजुला शोध घेतला तसेच शेततळ्यावर जाऊन पाहिले असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले.

भाऊसाहेब आंधळे यांनी आजूबाजूच्या शेतकर्‍यांना मदतीसाठी बोलावले असता नामदेव रामनाथ आंधळे, प्रविण विलास आंधळे यांनी धाव घेत शेततळ्यात उतरुन सोनलला पाण्याबाहेर काढले व खासगी वाहनातून दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारादरम्यान सोनलचा मृत्यू झाला. वडील भाऊसाहेब आंधळे यांनी नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्रात जाऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com