रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

मृत इसमाबाबत कोणाला काही माहिती समजल्यास संपर्क करण्याचे आवाहन
रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबईहुन इगतपुरीकडे येणाऱ्या कसारा घाटातील( Kasara Ghat ) रेल्वे मार्गावरील मिडल लाईनच्या रेल्वे बोगद्यात परवा दरम्यान एका ४० वर्षीय इसमाचा धावत्या रेल्वे एक्सप्रेस गाडीतुन पडल्याने जबर जखमी झाला होता.

याबाबतची माहिती इगतपुरी लोहमार्ग पोलीसांना ( Igatpuri Railway Police ) समजताच रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र बोराळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर इसमाला उपचारासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म नंबर दोनवर आणले असता रेल्वे हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.

या मृत इसमाची झडती घेतली असता कोणताही ओळखीचा पुरावा आढळुन आला नाही. या मृत इसमाचे वय अंदाजे ४० वर्ष असुन उंची साडेपाच फुट, डोक्याचे केस काळे पांढरे, उजव्या हातावर कन्नडी भाषेत काहीतरी गोंदलेले, चेहरा गोल, अंगात निळ्या रंगाची हाफ ट्रॅक पँट, निळ्या रंगाचा फुल शर्ट, शर्टवर सँटीगो असे लिहीलेले आहे.

या मृत इसमाबाबत कोणाला काही माहिती समजल्यास इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी हेमंत घरटे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com