मुलापाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप

देवळालीतील शिंदे कुटुंबियांवर करोनाचा घाला
मुलापाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप

देवळाली कॅम्प । Deolali Camp

देवळालीतील सेंट पॅट्रीक्स हायस्कुलचे शिक्षेकेतर कर्मचारी अजय शिंदे यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर लागलीच पाठोपाठ आईने देखील प्राण सोडल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वडिलांचे निधन झाले तेव्हा अजय ८ वर्षाचा होता. आईने वडिलांच्या जागी नौकरी करून अजय व 2 मुलींना शिकवले सर्वांचे संसार ठातून दिले,मुलगा अजय सेंट सेंट पॅट्रीक्स हायस्कुलमध्ये नोकरी करत होता. आई रंजना धर्मा शिंदे यांना करोनाची लागण झाल्याने अजय व मित्र परिवाराने त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले.

या धावपळीत अजय देखील पॉझिटिव्ह झाला. त्यासही उपचारासाठी दाखल केले, मात्र अजयच्या मनात कुठेतरी कमकुवतपणा घर करून गेला. त्यातच त्याचे निधन झाले. दररोज भेटावयास येणारा अजय दोन दिवसांपासून आला नाही. याची चिंता त्या मातेला लागली, त्यातच अजयचा करोनाने मृत्यू झाल्याची कुणकुण लागली आणि त्या मातेनेही मृत्यूला कवटाळले. या घटनेने देवळाली वासियांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

४६ वर्षीय अजय धर्मा शिंदे अत्यंत मनमिळावू असे व्यक्तिमत्व होते. क्रीडापटू मंहून त्यांचा नावलौकिक होता. येथील मास्टर स्पोर्टस क्लबचे ते क्रियाशील सदस्य होते. याशिवाय शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेचे जिल्हा पदाधिकारी होते. गत वर्षीच्या लॉक डाऊनमध्ये पोलिसां समवेत विशेष वाहतूक पोलिस अधिकारी बनत करोना योद्धा म्हणून कार्य केले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com