म्युकरमायकोसिसचा नाशकात पहिला बळी

म्युकरमायकोसिसचा नाशकात पहिला बळी
USER

नवीन नाशिक । प्रतिनिधी

म्युकर मायकोसिस आजाराने थैमान घातले आहे. असुन  चेतना नगर येथील येथील ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या आजाराने नाशकातील पहिला बळी गेला आहे.

नाशिक शहर व परिसरात करोना रूग्णाला म्युकर मायकोसिस आजार होत आहे. चेतना नगर परिसरात राहणारा ३४ वर्षीय तरुणावर नाशकातील खाजगी रुग्णालयात म्युकर मायकोसिस आजारावर उपचार सुरु होते.

रुग्णालयात उपचार सुरु असतांना शनिवारी सायंकाळी त्याचे निधन झाले. मोरवाडी अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. या आजाराला विविध राज्यांनी महामारी जीवघेणा साथरोग म्हणुन घोषित केले आहे. आरोग्य विभागाने ही या आजाराची गंभीर दखल घेतली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com