जाकीरशेख । घोटी Ghoti

गेल्या चार पाच दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील टाकेद परिसरातील परदेशवाडी शिवारातील आधारवाडी येथे सायंकाळी सहावाजेच्या सुमारास पडवीच्या अंगणात चार वर्षीय बालिका खेळत असताना अचानक दबा धरून असलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला होता.

जखमी अवस्थेत या बलिकेवर नाशिक येथे उपचार सुरु होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अयशस्वी ठरली. सोमवार रोजी रात्री सायंकाळी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते.

जया धोंडीराम चवर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चार वर्षीय बालिकेचे नाव असून तिच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेज येथे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली होती.

आपल्या लहान व भावंडांबरोबर घरातील अंगणात खेळत असताना १२ नोव्हेंबरच्या सायंकाळच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. मात्र मुलांनी आरडाओरड करताच बिबट्याने काढता पाय घेऊन धूम ठोकली होती.

गेल्या दोन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन बळी ठरलेल्या प्रकरणात ही तिसरी घटना आहे मात्र एकाही ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले. चिंचलेखैरे येथे एका वृद्ध महिलेचा तर कुरुंगवाडी येथे एका वृद्ध इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दोन महिन्यात ही तिसरी घटना झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.