गर्भवती महिलेचा मृत्यू

गर्भवती महिलेचा मृत्यू

इंदिरानगर | वार्ताहर Indiranagar

पाथर्डी फाटा ,विक्रीकर भवन जवळ, आनंद नगर येथील गजानन आर्केड, फ्लॅट नंबर 19 मध्ये राहणाऱ्या पूजा देवेंद्र मोराणकर (वय 45) या गर्भवती महिला घरातील कामे करून आंघोळ करून बाहेर आल्यानंतर अचानक चक्कर येऊन कोसळल्या.

त्यांचे वडील रमेश पाखले व त्यांच्या मुलीने पूजा यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र पूजा यांच्यासह त्यांच्या दोन जुळ्या बाळांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पूजा सात महिन्याच्या गर्भवती होत्या. या दुखद घटनेने प्रशांत नगर, पाथर्डी फाटा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोराणकर व पाखले कुटुंबीयांवर शोककळा पसरली .मूळ धुळ्याचे राहणारे देवेंद्र मोराणकर व (गणेशपुर पिंपरी चाळीसगाव) सध्या पुणे येथून दोनच दिवसापूर्वी पूजाला भेटायला आलेले वडील यांनी आपल्या लेकीची खूप काळजी घेतली होती. त्यातच अशी घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडल्याने मोठा धक्का दोघेही कुटुंबीयांना बसला आहे.

विशेष म्हणजे मोराणकर कुटुंबियांच्या घरात अनेक वर्षानंतर पाळणा हलणार होता. परंतु तत्पूर्वीच काळाने हा घाला घातल्याने मोराणकर व पाखले कुटुंबीय अतिशय दुःखात दिसून आले.घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री नऊ वाजता अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांची अंतिम यात्रा निघाली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com