Death of a patient in Wani due to corona
Death of a patient in Wani due to corona|वणीत एका रुग्णाचा मृत्यू
नाशिक

वणीत एका रुग्णाचा मृत्यू

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दिंडोरी Dindori l प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे करोनाने एका इसमाचा बळी घेतला असून, त्यामुळे वणी शहरात खळबळ उडाली आहे. दिंडोरी तालुक्यात वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत चालली आहे.

सध्या दिंडोरी तालुक्यात कोरोनाचे एकूण 7 बळी झाले आहे. वणी येथे 50 वर्षीय रुग्णाला कोरोनाची बाधा झाली. त्यात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यात त्याचा मृत्यू झाला.यापूर्वीही वणी शहरात रुग्ण आढळले आहेत. परंतु गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वणीत वाढत चालला आहे.

दिंडोरी तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत चालली असली तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आहे. कोरोना जर वेळेतच लक्ष्यात आला तर, त्यावर उपचार करता येतात.परंतु उशिरा उपचार सुरू झाले तर त्यावर उपचार करणे महागडे होऊन बसते.

त्यासाठी वेळेवरच उपचार करून घ्यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे. खेडगाव येथे 2 महिला आणि 2 पुरुष असे एकूण 4 रुग्ण सापडले आहेत. संध्याकाळी उशिरा पर्यंत अहवाल येत असल्याने नक्की नवीन रुग्ण संख्या कळू शकली नाही. दिंडोरी शहरातही रुग्णसंख्या वाढत असून लोक घरी बसत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com