अल्पवयीन मुलाचा चक्कर येऊन मृत्यू

अल्पवयीन मुलाचा चक्कर येऊन मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नवीन नाशकात क्रिकेट cricket खेळताना अचानक चक्कर आल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस सुधीर ढोरे ( 15 ) Shreyas Sudhir Dhore हा रणभूमी मैदान याठिकाणी क्रिकेट खेळत होता, त्याला अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com