विहिरीत पडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू
नाशिक

विहिरीत पडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू

सौंदाणे येथील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

मालेगाव । Malegoan

विहिरीत तोल जावून पडल्याने पाण्यात बुडून ३० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील सौंदाणे गावात घडली.

सारिका संतोष पवार (३०) हे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. (दि.१८) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सारिका पवार या विहिरीत पडल्याचे कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. मालेगाव येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. शकील अहमद, निवृत्ती कोराटे, विकास पवार व आबीद खान या चौघा जवानांनी विहिरीच्या पाण्यात उतरून शोध सुरू केला.

अर्ध्या तासानंतर सारिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले. तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com