आदर्शगाव संकल्प योजना प्रेरक

ग्रामसभेत कृषिमंत्री दादा भुसेंचे प्रतिपादन
आदर्शगाव संकल्प योजना प्रेरक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राज्य शासनामार्फत (state government) आदर्शगाव संकल्पना व प्रकल्प कार्यक्रम (Ideal village concept and project program) राबविण्यात येत असून दरवर्षी प्रभावीपणे सप्तसूत्री कार्यक्रम राबविणार्‍या आदर्श गावांची निवड या योजनेतून केली जाते.

सप्तसूत्रीच्या माध्यमातून निवड होत असली तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडण्याची जिद्द प्रत्येक ग्रामस्थांनी उराशी बाळगणे गरज आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आदर्शगाव संकल्प योजना प्रेरक ठरेल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील खडकी येथे विशेष ग्रामसभा (Gram Sabha) व गावफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना कृषिमंत्री भुसे बोलत होते. व्यासपिठावर आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच आशा देवरे, उपसरपंच ज्योती देवरे, बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पं.स. सदस्य भिकन शेळके, अभय पाठक, कृषी उपसंचालक सुरेश भालेराव,

तंत्रअधिकारी गणेश तांबे, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, ग्रा.पं. सदस्य सुर्यप्रकाश देवरे, कारभारी जाधव, भारती चव्हाण, राधीका जाधव, आशा गायकवाड, देवकाबाई मगरे यांच्यासह प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडकी गावाचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर गावे देखील अनुकरण करतील असा विश्वास व्यक्त करत कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले, वारकरी संप्रदायाला मानणारा मोठा वर्ग या गावात असल्यामुळे नशा मुक्तीसाठी पोषक वातावरण मिळणार आहे. खडकी गावात लोकसहभागातून यापूर्वीच अभ्यासिका व व्यायामशाळा (Gym) साकारण्यात आली आहेत. गावाच्या विकासासाठी अध्यात्माची जोड देण्यासोबतच भावी पिढीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध होणार्‍या सोयीसुविधांवरही भर देण्यात यावा. तालुक्यातील पाइप बंद कालव्यामुळे सिंचन क्षेत्रात तीनपट क्षेत्रवाढ होईल, परिणामी शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीवर त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल असे त्यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

योजनांची सांगड घालून साधा सर्वांगिण विकास : पवार

खडकी गाव हे खडकाळ भागावर वसले असून या गावाच्या विकासासोबतच गाव पाणीदार करण्यावर भर देण्याचे आवाहन करतांना आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी कृषीमंत्री व प्रशासकीय यंत्रणा जरी आपल्यासोबत असली तरी सप्तसुत्रीचा पाठपुरावा व त्याची प्रभावी अंमलबाजवणी आवश्यक आहे.

यातून मॉडेल गाव निर्माण करण्याचा प्रत्येक ग्रामस्थाने संकल्प करण्याचे आवाहन केले. शासन स्तरावर आज किमान 26 प्रस्ताव प्रलंबीत असतांना नवीन 25 गावे अंतर्भुत करण्यात आली आहेत. यामध्ये खडकी ग्रामपंचायतीचा समावेश असून शासनाच्या कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची योग्य सांगड घालून गावाचा सर्वांगिण विकास साधता येईल. हगणदारीमुक्त गाव ही संकल्पना शासनासाठी नाही तर गावातील आई-बहिणींसाठीच आहे याची जागृती करण्यात यावी, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी ग्रामकार्यकर्त्याची निवड करण्यात आली. त्याच बरोबर गावातील तरुण, तरूणी, ज्येष्ठ पुरूष व ज्येष्ठ महिला यांच्या मागण्या व भुमीकाही जाणून घेण्यात आल्या.

Related Stories

No stories found.