नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना येत्या 15 जानेवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत राज्यात पाच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2020-2021 करिता मुक्त विद्यापीठामार्फत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेत यंदाच्या वर्षी विद्यापीठाने उशिराने होणार्या प्रवेशांकरिता विलंब शुल्क माफ केले आहे. तसेच आर्थिक अडचणी लक्षात घेता टप्प्याटप्यामध्ये शुल्क भरण्याची मुभा दिली आहे. परिस्थितीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत याकरता ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवली आहे.

येत्या 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. कृषी अभ्यासक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवेश निश्चितीची स्थिती

गेल्या वर्षी विद्यापीठात सुमारे 6 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. यावर्षी राज्यभरातून (दि.5) पर्यंत 6 लाख 9 हजार 471 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी 5 लाख 78 हजार 447 विद्यार्थ्यांनी प्रोफाइलीसंदर्भात संपूर्ण माहिती दाखल केली आहे. 5 लाख 45 हजार 773 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत.

विभागनिहाय झालेले प्रवेश

अमरावती - 90 हजार 418

पुणे - 85 हजार 917

नांदेड - 85 हजार 033

नाशिक - 81 हजार 923

नागपूर - 72 हजार 339

औरंगाबाद- 56 हजार 265

कोल्हापूर - 37 हजार 835

मुंबई - 35 हजार 793

मुख्यालय - 250