पुरवणी परीक्षा अर्जासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदत

पुरवणी परीक्षा अर्जासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) दहावी (SSC), बारावीच्या (HSC) लेखी परीक्षा (Written test) यंदा होऊ शकल्या नाहीत. मूल्यमापनावर आधारित जाहीर निकालातही काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांसह श्रेणी सुधार योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) घेतली जाणार आहे....

या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. येत्या बुधवारी (दि. १८) ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नियमित शुल्कासह १८ ऑगस्टपर्यंत, तर विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्टदरम्यान मुदत असेल.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दहावी व बारावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. यामुळे २०२०-२१ च्या परीक्षांचे निकाल जुलै-ऑगस्टमध्ये जाहीर झाले. यामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट ऐवजी येत्या काळात घेतली जाणार आहे.

या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२१ मध्ये श्रेणीसुधारअंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची एक संधी या परीक्षेद्वारे उपलब्ध असेल. अशा विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा फी अदा केल्याने फक्त या विद्यार्थ्यांना वेगळी फी भरण्याची आवश्यकता नाही.

मात्र नव्याने अर्ज भरणे अनिवार्य असेल. पुरवणी परीक्षेसह २०२२ मधील मुख्य परीक्षा अशा लगतच्या दोन संधी नियमित विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com