
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष यांच्यातर्फे शिक्षणशास्त्र (Pedagogy) शाखेच्या बीए (BA), बीएड (BEd), बीएस्सी (B.Sc) या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परिक्षा (CET exam) घेतली जाणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थांना ८ जुलैपर्यंत ऑनलाईन (Online) अर्ज सादर करावे लागणार आहेत...
ज्या विद्यार्थ्यांचा कल, योग्यता शिक्षण विभागाकडे आहे, अशांसाठी शिक्षणशास्त्र शाखेत विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. बारावीनंतर पदवीसोबतच शिक्षणशास्त्र शाखेचे शिक्षण घेण्यासाठी संयुक्त शिक्षणक्रम उपलब्ध करून दिला आहे.
नॉन इंटिग्रेटेड प्रोग्राममध्ये (Non-integrated program) (BSc/BA) उमेदवाराला पदवी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि शिक्षण पदवी पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे (BEd General) परंतु याअंतर्गत चार वर्षे कालावधीतच बीए-बीएड (BA-BEd), बीएस्सी-बीएड (BSc-BEd) असा इंटिग्रेटेड शिक्षणक्रम शिकविला जातो.