पत्रकारिता अभ्यासक्रमास  प्रवेशासाठी शनिवारपर्यंत मुदत
नाशिक

पत्रकारिता अभ्यासक्रमास प्रवेशासाठी शनिवारपर्यंत मुदत

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘देशदूत’ माध्यम समूहातर्फे घेण्यात येणार्‍या पत्रकारितेची तोंडओळख या अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रमाच्या आता मोजक्याच जागा शिल्लक असून शनिवार (दि.१५ )पर्यंत प्रवेशाची मुदत आहे.

‘देशदूत’ने तोंडओळख पत्रकारितेची या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले ‘देशदूत’मधील संपादक हा अभ्यासक्रम झूम अ‍ॅपवर ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहेत. पत्रकारितेची तोंडओळख अभ्यासक्रमात पत्रकारिता, बातमीचे लिखाण, लेखन कौशल्य, वृत्त संकलन, ग्रामीण पत्रकारिता, ब्लॉग लिखाण आदी विषय शिकवण्यात येणार आहेत.

अभ्यासक्रमाचे शुल्क एक हजार रुपये आहे. शनिवारपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशप्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी 9423487920 या क्रमांकावर संपर्क साधावा. अभ्यासक्रमासाठी मोजक्याच जागा असल्याने http://deshdoot.org/course/ या वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com