तिसऱ्या यादीत ४ हजार विद्यार्थ्यांसाठी जागा वाटप

अकरावी प्रवेश : १८ डिसेंबरपर्यंत प्रवेशाची संधी
file photo
file photo

नाशिक | Nashik

अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी (दि. १५) शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रसिध्द केली. त्याअतंर्गत ४ हजार १११ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे.

त्यामध्ये कला शाखेच्या ७२२, वाणिज्यच्या १ हजार ३६६, विज्ञान शाखेच्या १ हजार ९७१ तर एमसीव्हीसीच्या ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १८) डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या फेरीत सुमारे ८ हजार १४०, तर दुसऱ्या फेरीत २ हजार ६५० विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. दोन्ही फेऱ्यांमध्ये एकूण १० हजार ७९० प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी १४ हजार ४८० जागा उपलब्ध झाल्या आहेत. तिसरी गुणवत्ता यादीत अनेक महाविद्यालयांतील विज्ञान शाखेचा कटऑफ ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. केटीएचएम महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटऑफ ७९.६ तर विज्ञान शाखेचा ९१.४ टक्के जाहीर झाला. तर पंचवटी महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कटऑफ ८६.८, एचपीटी-आरवायके महाविद्यालय विज्ञान शाखेचा कटऑफ ९१.४ टक्के आहे. भोसला मिलीटरी महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटऑफ ८३.६ टक्के तर विज्ञान शाखेचा कटऑफ ८५ टक्के आहे.

दरम्यान, तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर विशेष प्रवेश फेरी होणार आहे. त्यामध्ये व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इन हाउस कोट्यातील रिक्त जागांचा समावेश राहणार आहे. विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील २० डिसेंबरला प्रसिध्द केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालयनिहाय खुल्या प्रवर्गाचा कटऑफ

केटीएचएम

कला ६९.६, वाणिज्य (मराठी) ७९.६, वाणिज्य (इंग्रजी) ८७.४, विज्ञान ९१.४

भोसला मिलीटरी कॉलेज

कला ६८.४, वाणिज्य (मराठी) ८३.६, विज्ञान ८५

एचपीटी, आरवायके

कला ७२, विज्ञान ९१.४,

बीवायके

वाणिज्य ८८.२, वाणिज्य (विनाअनुदानित) ८७.८,

जी. डी. सावंत

कला ४९.६, वाणिज्य (मराठी) ६२.२, विज्ञान (विनाअनुदानित) ८४

पंचवटी

कला ६५.६, वाणिज्य (मराठी) ६९.८, विज्ञान ८६.८

व्हीएन नाईक

कला ६६.६, वाणिज्य ७१, विज्ञान (विनाअनुदानित) ८८.८

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com