टाळकुटेश्वर मंदिरानजीक नदीपात्रात आढळला युवकाचा मृतदेह

टाळकुटेश्वर मंदिरानजीक नदीपात्रात आढळला युवकाचा मृतदेह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीतील (Panchavati) टाळकुटेश्वर नदी पात्रात अज्ञात युवकाचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली...

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार (दि.११) सकाळी सात वाजेच्या सुमारास टाळकुटेश्वर (Talkuteshwar) येथे नदी पात्रात अंदाजे ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह तरंगतांना परिसरातील नागरिकांना आढळून आला.

त्यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहचत जिवरक्षकांच्या मदतीने अज्ञात युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

या युवकाने अंगात निळ्या व सफेद रंगाचा हाफ टी शर्ट परिधान केला असून हाताला लाल रंगाचा धागा, शरीर सडपातळ, रंग सावळा चेहरा गोल असे त्याचे वर्णन असून अशा युवकाबद्दल कुणास काही ठाऊक असल्यास त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी (Panchavati Police Station) संपर्क साधावा, असे आवाहन सपोनी आर. एम. केदार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.