येवला । Yeola

येवला तालुक्यातील मुखेड येथे मृत बिबट्या आढळून आला. विजय आहेर यांच्या मळ्यात सध्या ऊसाची तोड सुरू आहे.

या उसाच्या फडात काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मजुरांना सुस्त पडलेला बिबट्या आढळला. ऊसतोड मुकादमाने बिबट्याजवळ जाउन पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. ही बाब त्यांनी त्वरेने शेतमालक विजय आहेर यांना कळविली.

रात्रीची वेळी वनखात्याच्या अधिकार्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. बिबट्या अंदाजे आठ ते दहा दिवसांपुर्वी मृत झाला असावा, असा अंदाज आहे. मानोरी येथील सदाशिव शेळके यांच्या शेतात तसेच मुखेड शिवारातील दतवाडी परिसर ह्या सुमारे दहा ते पंधरा कि.मी परिसरात ह्या बिबट्याचा वावर होता.

तसेच हा बिबट्या पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. त्यावेळी कॅमेर्यात ह्या बिबट्याचे छायाचित्र कैद झालेले होते, अशी माहिती वनखात्याच्या टिमने व्यक्त केली.