
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkarwada Police Station) हद्दीत २० ते २५ वर्षे वयोगटाच्या तरुणाचा (Youth) बांधकाम इमारतीच्या तळमजल्यावरील साचलेल्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे...
याबाबत यमराज शेषलाल कुसराम यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार (Prosecutor) कुसराम हे शरणपूर रोडवरील (Sharanpur Road) द एम्पायर बिल्डिंग येथील बांधकामाच्या साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत असतांना सदरहू बिल्डिंगच्या तळमजल्यावरील पाणी (Water) काढायला वॉचमनसोबत गेले असतांना त्यांना तेथे ४ फूट ६ इंच उंचीचा अंदाजे २० ते २५ वयोगटातील युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यावरून कुसराम यांनी सरकारवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा (Sudden Death) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.ए. नेमाने करत आहेत. सदरहू वर्णनाच्या युवकाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी (Police) केले आहे.