त्र्यंबक नगरीत आता दिवसाआड पाणी !
आंबोली धरणdigi

त्र्यंबक नगरीत आता दिवसाआड पाणी !

त्र्यंबकेश्वर । Trimabkeshwer

अंबोली व अहिल्या धरणात पाणी साठा कमी झाल्याने आता त्र्यंबक नगरीत दिवसा आड पाणी पुरवठा होणार आहे. याबाबतची माहिती नगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान त्र्यंबकला पाणी पुरवठा करणारे अंबोली धरण सध्या अर्ध्यावर आले आहे. त्यामुळे पाणी मी पर्यत पुरले पाहिजे. या हेतूने नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. येत्या २१ एप्रिल पासून पाणीकपात सुरु होणार आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. गौतमी गोदावरी बेझें धरणातूनही त्र्यंबकला पाणी पुरवठा केला जातो, परंतु अनेक दिवसापासून आवर्तन सुरु असल्याने तेथून पाणीपुरवठा बंद आहे.

अलीकडेच एप्रिल पाणी पट्टी १२५० वरून १५०० रुपये करण्यात आली आहे. करोना काळात हात धुणे, स्वच्छता राखणे यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज नागरिकांना असतानाच पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com