शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू

शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू

दहिवड । वार्ताहर | Dahiwad

देवळा तालुक्यातील (deola taluka) मेशी (meshi) व दहिवडला शेतीपंपांसाठी (Agricultural pumps) पूर्वीप्रमाणे दररोज दिवसा सुरळीत वीजपुरवठा (power supply) मिळणार असून आ.डॉ. राहुल आहेर (MLA Dr Rahul Aher) यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने परिसरातील शेतकर्‍यांनी (farmers) समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक जिल्ह्यात (nashik district) मेशी व दहिवड या दोन गावांसाठी सुमारे चार वर्षांपूर्वी धोबीघाट येथे एकच सौरऊर्जा प्रकल्प (Solar power plant) कार्यान्वित केला गेला. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यापासून गेल्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेतीपंपांसाठी (Agricultural pumps) दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आठ तास वीजपुरवठा मिळत होता. परंतु मार्च महिन्यापासून ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सदर प्रकल्पातून होणारा वीजपुरवठा (power supply) बंद करत इतर गावांप्रमाणेच या दोन्ही गावांनाही शेतीपंपांसाठी रात्री वीजपुरवठा (power supply) केला जात होता.

याबाबत मेशी येथील राजू शिरसाठ, तुषार शिरसाठ, दहिवडचे मणेश ब्राम्हणकार, गणेश देवरे यांच्या शिष्टमंडळाने आ.डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत पूर्वीप्रमाणेच शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा मिळण्यासाठी निवेदन (memorandum) देत चर्चा केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व माजी ऊर्जामंत्री बावनकुळे (Former Energy Minister Bawankule) यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार आ.डॉ. आहेर यांनी प्रयत्न केल्याने मेशी व दहिवडला दि.29 जुलैपासून शेतीविजपंपांना पूर्वीप्रमाणे दिवसा सुरळीत वीजपुरवठा सुरू झाल्याने लाभधारक शेतकर्‍यांनी (farmers) समाधान व्यक्त केले.

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा (power supply) सुरळीत होताच मेशी व दहिवड परिसरातील लाभधारकांनी धोबीघाट वीज उपकेंद्राच्या कर्मचार्‍यांचा शाल, श्रीफळ देत सत्कार केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, तुषार शिरसाठ, दहिवड उपसरपंच मणेश ब्राम्हणकार, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश देवरे, विलास देवरे, महेंद्र जाधव, काळू खैरनार, मोहित सूर्यवंशी, सुशांत घोडे, प्रभाकर वाघ, भाऊसाहेब जाधव, गणपत सोनवणे, हेमंत देवरे, समाधान पवार, श्याम अहिरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com