वसुलीसाठी आता दवंडी!; जिल्हा बँकेचा थकबाकीदारांना धक्का

वसुलीसाठी आता दवंडी!; जिल्हा बँकेचा थकबाकीदारांना धक्का

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Central Cooperative Bank) आणि विविध विकास कार्यकारी सोसायटीकडील (Various Development Executive Societies) कर्ज थकबाकीदार (Loan outstanding) शेतकर्‍यांची (farmres) नावे आता गावात व चावडीवर दवंडी देऊन जाहीर केली जाणार आहे.

कृषी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची नावे गावात चावडीवर लावून त्यांची दवंडी देण्यात येणार असल्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCC Bank) व विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्याकडील कर्ज वसुलीचा (Debt recovery) कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहे. यामध्ये थकबाकीदार शेतकर्‍यांची नावे गावात चावडीवर दवंडी देऊन घोषित करण्यात येणार आहेत, तसेच ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर देखील यादी लावण्याचे आदेश आयुक्तांनी परित्रकाव्दारे दिले आहेत.

जिल्हा बँक असो की, सहकारी संस्था यांची कर्जवसुलीसाठी 30 जून ही अंतिम मुदत असते. आता ती मुदत संपुष्टात आली असल्याने विकास संस्था स्तरावरील थकबाकी निश्चितीची कार्यवाही व तदनंतरची वसुली प्रक्रीया (Recovery process) नियोजनपूर्वक टप्या-टप्याने व कालबध्द पध्दतीने राबविण्यात यावी. यासाठी सहकार आयुक्त यांनी परिपत्रक काढले आहे.

यात वसुली संबंधीचा कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधी सूचनाही करण्यात आल्या आहेत. कृषी कर्ज वसुलीबाबत सहकार आयुक्तांनी सोसायटी व बँकांना कर्जवसुलीचा कृती आराखडा तयार करून ऑक्टोबरपर्यंत आराखड्यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे.

बड्या शंभर थकबाकीदारांची यादी

तालुका स्तरावर बँकेच्या अधिकार्‍यांनी तालुक्यातील बड्या शंभर थकबाकीदारांची यादी तालुका पातळीवर बाजार समिती सोसायटी नोटीस बोर्ड, बँक नोटीस बोर्ड येथे प्रसिध्द करावयाची आहे, तसेच थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात जाहीर करायची आहेत. बँक निरीक्षक अधिकारी, सोसायटी सचिव व संचालक मंडळ यांनी नियमांचे तंतोतंत पालन करून वसुली आराखड्यानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अनिल कवडे यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com