अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली ; कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला दिली तिलांजली

अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली ; कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला दिली तिलांजली

इगतपुरी । प्रतिनिधी

मरण आणि तोरण प्रसंगात अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, परंपरांमुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. दुःखद प्रसंगात विधवेलेला अपमानास्पद वागणूक दिली गेल्याने महिलांचे खच्चीकरण व अपमान होतो. या चुकीच्या रूढी परंपरेमधून समाज मुक्त व्हावा यासाठी धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथून सुरवात करण्यात आली.

प्रगतशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे (वय ७९) यांच्या अंत्यविधीवेळी पुरुष खांदेकरी ऐवजी सून माधुरी भदाणे, अनिता भदाणे, कन्या जागृती सोनवणे, पुतणी डॉ. रोहिणी शिंदे, कृषि पर्यवेक्षक प्रियंका पाटील, नलिनी पाटील यांच्यासह बहिणी सिंधूबाई पवार, चित्राबाई सोनवणे, आशाबाई शिंदे, निर्मला सूर्यवंशी या महिला खांदेकरी झाल्यानंतर अंत्ययात्रा निघाली.

अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या सुना, बहिणी व मुली ; कुंकू पुसणे, बांगड्या फोडण्याला दिली तिलांजली
मराठा आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही...; देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वस्त

वसंतराव भदाणे हे बोरकुंड येथील डॉ. राजेश पाटील यांचे बंधू, दीपक भदाणे, सामाजिक कार्यकर्ते योगेश भदाणे यांचे वडील व माधुरी भदाणे व अनिता भदाणे यांचे सासरे होते. सुलभा कुवर, नूतन पाटील यांनी यावेळी विधवा महिलांचे सौभाग्य अर्पण करून बांगड्या फोडून, कुंकू पुसून अपमान केला जात असल्याचे सांगितले.

हे बंद करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करूया असे त्या म्हणाल्या. भदाणे कुटुंब आणि गावकऱ्यांनी सर्वानुमते या उपक्रमास प्रतिसाद दिला. कोणतेही कर्मकांड कालबाह्य रूढी परंपरा न करता पत्नी लता भदाणे यांच्या हस्ते पूजन करुन अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. बोरकुंड येथे रविवारी १ होणाऱ्या कार्यक्रमात मरण आणि तोरण प्रसंगातील चुकीच्या प्रथा या विषयावर व्याख्यान, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आणि वृक्षारोपण होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com