जात प्रमाणपत्रासाठी वडिलांचा बनावट दाखला; गुन्हा दाखल

जात प्रमाणपत्रासाठी वडिलांचा बनावट दाखला; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जात प्रमाणपत्र (Caste certificate) मिळविण्यासाठी वडिलांचा बनावट शाळा सोडल्याचा दाखला (Fake school leaving certificate) जोडण्याचा प्रकार सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkarwada Police Station) हद्दीत प्रांत कार्यालयात घडला आहे...

याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा भोला भगवाणे (वय २०) असे या युवतीची नाव आहे. नाशिक उपविभागीय कार्यालयातील अधिकारी रविराज रायकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या (State Government) आपले सरकार या पोर्टलमार्फत प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना युवतीने आपल्या वडिलांचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला जोडून जात प्रमाणपत्र मिळविले होते.

या प्रमाणपत्राचा ठिकठिकाणी वापर झाल्याचे निष्पन्न झाले. ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com