दसाणा लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो

दसाणा लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो

पिंगळवाडे | Pingalwade

दसाणा (ता. बागलाण) येथील पाणलोट क्षेत्र (Catchment Area) गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. केरसाणे, विरगाव परिसराला वरदान ठरणारा दसाणा लघुमध्यम प्रकल्प ओव्हरप्लो (Dasana Project Overflow) झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे...

या परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य या प्रकल्पावर अवलंबून असून सोमवारी सकाळपासून शेतकरी प्रकल्प क्षेञात पाणी पाहण्यासाठी गर्दी करीत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला.

या प्रकल्पामुळे दसाणे गावासह केरसाणे विरगावपाडे, विरगाव या गावाचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागतो. कान्हेरी नदीचे उगमस्थान याच प्रकल्पापासून होतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com