गिरणा पात्रातून धोकादायक प्रवास; पुल बांधण्याची मागणी

गिरणा पात्रातून धोकादायक प्रवास; पुल बांधण्याची मागणी

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी (farmers), ग्रामस्थ, शिक्षक (Teachers) व विद्यार्थ्यांना (students) गिरणा नदीपात्रातून (girna river) स्वत:चा जीव धोक्यात घालून

शेतात, शाळेत तसेच कामानिमित्त गावात जावे लागत आहे. गिरणा नदीस आलेल्या पुरामुळे (flood) नागरीकांचे अतोनात हाल होत असल्याने गिरणा नदीपात्रावर पुलाचे बांधकाम (bridge) तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

बोराळे गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून 500 हेक्टर क्षेत्र हे नदी पलीकडच्या बाजूला आहे. शंभरापेक्षा अधिक नागरीक, शेतकरी हे गिरणानदीच्या (girna river) पलीकडच्या बाजूला राहतात व पूर्ण गावाच्या शेती जलसिंचनाच्या विहिरी या नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत. त्यामुळे रोज नदीपात्रात उतरून शेतीपंप चालू करण्यासाठी व शेतात काम करण्यासाठी जावे लागते.

शेतीसाठी लागणारे मजूर सुद्धा रोज आपला जीव मुठीत धरून गिरणा नदीच्या पात्रात उतरतात. नदीपलीकडे धनगर समाजाची 500 लोकांची वस्ती आहे. येथे असलेल्या जि.प. वस्ती शाळेवर जाणार्‍या शिक्षकांनासुद्धा रोज नदीच्या पात्रात उतरून जावे लागते. शेतकर्‍यांना शेतीचा माल काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो.

गिरणा नदीस (girna river) आलेल्या पुरातून गावाच्या दुसर्‍या बाजूस जीव धोक्यात घालून जावे लागत असल्याने आतापर्यंत बैलगाडीचा अपघात होण्याच्या आठ ते दहा घटना घडल्या असून त्यामध्ये शेतकर्‍यांचा (farmers) व बैलांचा देखील मृत्यू झालेला आहे. 1972 ते 2019 पर्यंत आठ शेतकरी नदीपात्रात वाहून गेलेले असून पाच ते सहा शेतकर्‍यांना वाहत असतांना गावातील तरुणांनी वाचवले आहे.

गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग (water discharge) मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. दररोज दहा ते पंधरा हजार क्युसेस पाणी गिरणा नदीपात्रातून वाहत आहे. यामुळे नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढून धोकादायक बनल्याने शेतकर्‍यांना शेतातील गुरांना चारा पाणी करण्यासाठी 25 किलोमीटरचा फेरफटका घालून जावे लागण्याची वेळ आली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना (school students) व शिक्षकांना (teachers) देखील मोठी कसरत करून शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे.

बोराळे येथे गिरणा नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी गत अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. धरण भरल्याने गिरणा पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशा धोकादायक परिस्थितीत देखील जीव धोक्यात घालून शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांना जावे लागते. यामुळे पुन्हा अप्रिय घटना घडण्याअगोदर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून संबंधित विभागाने लवकर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com